पेटीएमच्या ‘या’ निर्णयामुळे शेअर्समध्ये झाली २० टक्क्यांनी घसरण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

छोटी पोस्टपेड कर्ज करण्याच्या योजनेमुळे पेटीएम शेअर्सला धक्का बसला आहे. ७ डिसेंबर रोजी रुरुवातीच्या व्यापारातच,पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सचा शेअर्समध्ये २० टक्के घसरण झाली.

कंपनीने लहान आकाराची पोस्टपेड कर्जे कमी करण्याची आणि मोठ्या वैयक्तिक कर्जे आणि व्यापारी कर्जे वाढवण्याची योजना जाहीर केली. ब्रोकरेजला कंपनीचा हा निर्णय आवडला नाही, त्यांनी कंपनीच्या महसुलाचा अंदाज कमी केला. आज सकाळी पेटीएमचे शेअर्स बीएसईवर ७४४.९५ आणि एनएसईवर ७२८.९५ रुपयांच्या घसरणीसह उघडले. उघडल्यावर त्यात २० टक्क्यांची घसरण झाली आणि बीएसई आणि एनएसई दोन्ही निर्धेशांकावर पेटीएमचे शेअर्स अनुक्रमे ६५०.५५ रुपये आणि ६५०.४५ रुपयांवर पोहोचले

अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने वैयक्तिक कर्जाशी संबंधित नियम कडक केले आहेत. RBI ने लहान कर्जाचे जोखीम वेटेज 25 टक्क्यांनी वाढवले ​​आहे आणि ते 100 टक्क्यांवरून 125 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सेंट्रल बँकेच्या या निर्णयानंतर वैयक्तिक कर्ज महाग होणार असून पेटीएमसारख्या कंपन्यांना असुरक्षित वैयक्तिक कर्जाची संख्या कमी करणे भाग पडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.