प्रतापगडावर शिवरायांच्या पराक्रमाचा देखावा लवकरच; मंत्री लोढांची ट्विटरवरून घोषणा

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या केलेल्या वधाचा इतिहास माहित नसणारा कोणीही नसेल. आणि अन्य लोकांनाही त्यांच्या पराक्रमांची प्रचीती यावी म्हणून आता त्याच किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचे शिवप्रताप स्मारक आणि आणि लाइट व साउंड शो सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पर्यटन कौशल्य आणि रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत एक ट्विट करून शो सुरू करण्याबाबतचे तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आल्याचे पत्रही जाहीर केले आहे.

शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाइट व साउंड शो सुरू करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे!

पर्यटन विभागाच्या सचिवाला मंत्री लोढा यांनी पत्र पाठवले. त्यातील मजकूर असा की, ”महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे. प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज व अफजलखान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याप्रसंगाची इतिहासात महत्वाची नोंद आहे, जी आजही कोट्यवधी शिवभक्तांना प्रेरित करीत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.