अनुकंपाधारकांचा आक्रमक पवित्रा; मनपा प्रशासनावर दिशाभूल करण्याचा आरोप…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने अनुकंपा संदर्भात समिती गठीत केली होती, मात्र त्यांनी दिलेल्या अहवालात विविध कारण सांगितले आहे. त्यामुळे मनपा प्रशासन अनुकंपाधारकांची दिशाभूल करत आहे. अशी तक्रार अनुकंपा धारकांनी पत्रकाद्वारे केली आहे.

जसे की आकृतीबंध, बिंदूनामावली तसेच परंतु या सर्व गोष्टींची अनुकंपा भरतीसाठी आवश्यकता नाही असे शासनाने आधीच अन्य प्रकरणांमध्ये मार्गदर्शन केलेले आहे. ते असे अनुकंपा नियुक्ती द्यावयाचे पद हे यापूर्वीच मंजूर पद असल्याने व अनुकंपा पदभरती ही नवीन भरती नाहीये. तसेच अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देत असताना संबंधित पद नव्याने निर्माण केले जात नसल्यामुळे अनुकंपा नियुक्ती देण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही करताना बिंदुनामावली वा आकृतीबंध निश्चित नाहीये. पर्यायी प्रस्ताव अमान्य न करता त्यावर गुणवत्तेनुसार कार्यवाही करावी असे अलीकडेच एका अन्य प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निरीक्षणानुसार महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शन केलेले आहे.

लेखापरीक्षण अहवालातील नावासमोरील त्रुट्यापाहता महाराष्ट्र नागरी अधिनियम (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील १३ (चार) अन्वये कर्मचारी मयत झाल्यावर त्याच्यावरील सर्व कारवाई संपुष्टात येते. या नियमानुसार कोणतीही शिस्तभंग विषयी कारवाई अशा शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर चालू ठेवता येणार नाही. असे शासनाच्या कार्यवाही विषयक नियम पुस्तिकेत नमूद असून सुद्धा नियुक्ती देण्यास विलंब करीत आहेत. याविषयी म.न.पा प्रशासन काही बोलत नाही. मनपा प्रशासनाकडून दिशाभूलीचे प्रयत्न केले जात आहेत.

मनपातील अधिकारी स्थानिक स्तरावर सक्षम नसतील तर त्यांनी मुंबई येथे येऊन आमच्या १० वर्षापासूनच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा हीच आमची विनंती आहे. आम्ही सर्व अनुकंपाधारक या आठवड्यात पुन्हा मुख्यमंत्री यांची भेट घेऊन वैयक्तिकरित्या आमच्या व्यत्या लेखी स्वरूपात मांडणार आहेत.असे ते म्हणाले.

त्याच बरोबर अनेक अनुकंपा धारक परिवार आपला उदरनिर्वाह सोडून मुंबई येथे मंत्रालयामध्ये गेल्या १५ दिवसापासून ठाण मांडून आहेत. जो पर्यंत नियुक्ती विषयी योग्य तो निर्णय दिला जात नाही. तो पर्यंत त्यांनी न येण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यास सांगितले जात आहे. म्हणून आमच्यातील काही अनुकंपाधारक हे आपला कामधंदा सोडून मुंबई येथे मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी तेथे मिळेल त्या ठिकाणी राहत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.