पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशासह राज्यात देखील पुन्हा कोरोनाचे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच आता राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज समोर आली आहे. मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून यांच्यावर पुण्यातील निवासस्थानीच उपचार सुरू आहेत. यापूर्वी देखील त्यांना दोनवेळा कोरोनाची लागण झाली होती.
वाढते कोरोनाचे सावट पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील परस्थितीचा आढावा घेतल. यावेळी या बैठकीच्या माध्यमातून कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी महापालिकांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी कोरोनासाठी राखीव बेड, मास्क, पीपीई किट, ऑक्सिजन व्यवस्था, जम्बो सिलिंडर्स तसेच औषधसाठ्याचा आढावा घेत सर्व सज्जतेचे आदेश सरकारने दिले आहेत. सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे यांसारखी लक्षणे आढळल्यास अशा संशयित रुग्णांची कोरोना टेस्ट करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला सरकारकडून देण्यात आल्या आहेत.