लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील आंबेडकर नगरात बुधवार(दि. २०) रोजी रात्री साडेकराच्या सुमारास दुचाकीस्वारावर धारधार चाकूने हल्ला झाला असून, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जखमी महेंद्र उर्फ मनोज नवल राठोड (वय २७) याच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जुने जळगाव, आंबेडकर नगरातील रहिवासी महेंद्र उर्फ मनोज नवल राठोड (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीत सांगितल्याप्रमाणे बिधावर ( दि.२०) रोजी रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून जात असतांना त्यांना विक्की ज्ञानेश्वर माळी (वय १८, रा.जानकी नगर) याने लिफ्ट मागितली, मात्र महेंद्र राठोड यांचे वाहन थांबवून शिवीगाळ,दमदाटी करत चाकूने हल्ला करून जखमी केले आहे. जखमींच्या जबाबावरून शनिपेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक योगेश जाधव तपास करीत आहेत.