महिला लैंगिक शोषण कायद्याबाबत रेल्वे डाक सेवा कार्यालयात जनजागृती

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महिला लैंगिक शोषण कायदा 2013 निमित्त जळगाव रेल्वे स्टेशन वरील रेल्वे डाक सेवा कार्यालयात एल विभागात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी महिला कर्मचार्‍यांना सदर  कायद्याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले गेले.

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ऍड. भारती कुमावत, अध्यक्ष ज्ञानभारती फाउंडेशन तसेच ऍड. ऐश्वर्या मंत्री लाभले. यावेळी त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती विवेचन केले. अध्यक्षस्थानी पी. सी.  सपकाळे उपस्थित होते.

तसेच एसआरओ एस. डी. कोल्हेकर, ओ ए दिपक डी पाटील, कार्यालयीन कर्मचारी बी. व्ही. भावसार, के. पी. बनसोडे, पी. बी. पाटील, रोशनी जे कोळी, अजित एम तडवी, शुभम पी निरखे उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन रोशनी जे कोळी यांनी केले तर आभार दिपक डी पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.