जळगावात एमआयडिसीतील कंपनीला आग ; २० लाखांचे नुकसान

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

एमआयडीसीपरिसरातील जी सेक्टर मध्ये असणाऱ्या आकाश प्लास्टिक कंपनीत १७ एप्रिलला शार्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत कच्चा माल व मशिनरी जळून खाक झाल्याची घटना घडली असून आगीत जवळपास २० लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव एमआयडीसीतील जी -सेक्टर मधील आकाश प्लास्टिक कंपनीत सोमवारी १७ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास कंपनीतील शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीत प्लास्टिक बनविण्याचा कच्चा माल आणि मशिनरी जळून खाक झाले होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचा अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीत अंदाजे २० लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. खंडू किसन पवार रा. अयोध्या नगर, जळगाव यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.