संतापजनक; कुकरमध्ये शिजवून कुत्र्याला खायला घातले प्रियसीचे तुकडे, मीरारोड परिसरात खळबळ

0

मीरा रोड, लोकशाही न्यूज नेटवर्क

मीरा रोड परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे. मीरा रोड याठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीने आपल्या ३२ वर्षीय प्रियसीची निर्घृण हत्या केली, व हत्येनंतर आरोपीने प्रियेसीचा मृतदेहाचे तुकडे कटरने करत ते कुकरमध्ये शिवले आणि कुत्र्याला यायला घातल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेप्रकारानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नाराजी व्यक्त केली असून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे कि ” ‘मुंबई येथील मीरारोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून आणि मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे.”

दरम्यान, मीरा रोडच्या गीतानगर फेज ७ मधील आकाशदीप इमारतीत हि घटना घडली आहे. याठिकाणी मनोज सहानी (५६ वर्ष) आणि सरस्वती वैद्य (३२ वर्ष) हे दोघंही लिव्ह एन मध्ये राहत होते. या इमारतीत दोघंही ३ वषांपासून भाड्याने वास्तव्य करत होते. दोघांमध्ये सतत किरकोळ कारणांवरून वाद होत असे. त्यामुळे मनोजने धारधार शस्त्राने हत्या करून आरोपीने मृतदेहाचे अनेक तुकडे करून काही तुकडे कुकरमध्ये शिजवून तर काही मिक्सर मध्ये बारीक करून कुत्र्याला खायला घातले. आरोपीच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारच्यांना संशय आला व आरोपीच्या संशयास्पद हालचालींमुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.