Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»महागाईचा झटका.. एप्रिलपासून 800 औषधांच्या किमती वाढणार..
    आरोग्य

    महागाईचा झटका.. एप्रिलपासून 800 औषधांच्या किमती वाढणार..

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 26, 2022Updated:March 26, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, कच्चे तेल, दूध यासह अनेक जीवनावश्यक गोष्टींच्या किमती वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यातच आणखी एक भर पडली आहे. पॅरासिटामॉल, अजिथ्रोमायसिन यासह इतर आवश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून 10.7 टक्क्यांनी वाढणार आहेत.

    शुक्रवारी भारतीय राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीच्या घाऊक किंमत निर्देशांकात (WPI) 10.7% ची किंमत वाढवल्याची घोषणा केली आहे. यामुळे ग्राहकांना काही आवश्यक औषधांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

     

    “वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागाराच्या कार्यालयाने दिलेल्या घाऊक किंमत निर्देशांक डेटाच्या आधारे, घाऊक किंमत निर्देशांकामध्ये वार्षिक बदल 2020 च्या संबंधित कालावधीच्या तुलनेत 2021 च्या कॅलेंडर वर्षात 10.76607% इतका आहे,” भारतीय राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने एका नोटीसमध्ये म्हटले आहे. ही नोटीस शुक्रवारी जारी करण्यात आली.

    ताप, संक्रमण, त्वचा रोग, उच्च रक्तदाब, अशक्तपणा आणि हृदयविकारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी (NLEM) वरील जवळपास 800 औषधांचे दर 1 एप्रिलपासून 10.7 टक्क्यांनी वाढतील. त्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादीमध्ये (NLEM) पॅरासिटामॉल, अजिथ्रोमाइसिन, फेनोबार्बिटोन, सिप्रोफ्लोक्सासिन हायड्रोक्लोराइड, फेनिटोइन सोडियम आणि मेट्रोनिडाझोल सारख्या आवश्यक औषधांचा समावेश आहे.

    केंद्राने जीएसटी माफ करावा

    औषधांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांवर भार पडणार आहे. केंद्र सरकारने औषधींवरील जीएसटी कमी केला तर औषधी स्वस्त होतील. तसेच जिल्हा केमिस्ट संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तसेच मुख्यमंत्र्यांना देखील जीएसटी माफ होण्यासाठी ट्विट केले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु असल्याने औषधींसाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे दर वाढले असून टंचाई निर्माण झाल्याने औषधींचे भाव वाढले आहेत. अशी प्रतिक्रिया जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी दैनिक लोकशाही ~ लोकलाईव्हशी बोलतांना दिली.

    District Chemist Association President Sunil Bhangale Inflation medicines to get expensive from April National List of Essential Medicines (NLEM) National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) New Delhi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली सक्रिय

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif