Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»भुसावळात घराला भीषण आग; वडिलांचा होरपळून मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
    ताज्या बातम्या

    भुसावळात घराला भीषण आग; वडिलांचा होरपळून मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 26, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरातील नाहाटा महाविद्यालयाजवळील महेश कॉलनी परीसरातील एका फ्लॅटला आज पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी कुटुंब गाढ झोपेत असतानाच आगीचा विळखा पसरल्याने 55 वर्षीय कुटुंबप्रमुखाचा आगीत होरपळून मृत्यू झाला, तर त्यांचा 32 वर्षीय मुलगा आगीत गंभीर जखमी झाला आहे. पहाटेच्या सुमारास आग लागल्याचे कळताच रहिवाशांनी धाव घेवून आग विझवण्याचा प्रयत्न केला तर अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले.

    पहाटेच्या सुमारास लागली आग

    नाहाटा महाविद्यालयाजवळील महेश कॉलनीतील निकुंज अपार्टमेंटमध्ये दुसर्‍या मजल्यावर केशवलाल वाधवाणी हे आपल्या कुटुंबासह राहतात. शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून आरोळ्या ऐकू होत्या तर आगीच्या ज्वाला बाहेर पडताच रहिवाशांनी लागलीच धाव घेवून मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरीकांनी तातडीने अग्नीशामन दल आणि बाजारपेठ पोलिसांना माहिती सूचित केली तर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

    मात्र या आगीत केशवलाल वाधवाणी (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर त्यांचा 32 वर्षीय मुलगा लखन वाधवाणी हा गंभीररीत्या होरपळला. त्याला उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.

    नागरीकांची मदत कार्यासाठी धाव

    माजी नगरसेवक महेंद्रसिंह उर्फ पिंटू ठाकूर यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले. वाधवानी कुटुंबात चार जण राहत असून ही आग नेमकी कशी लागली याबाबत माहिती समोर आलेली नाही.

    #bhusawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif