सावधान ! जळगावात गोवरचे ११ रुग्ण आढळले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना विषाणूचे (Corona virus) सावट संपत नाही तोच राज्यात (Maharashtra) पसरलेली गोवरची साथ (Measles Disease) आता जळगाव शहरातही (Jalgaon City) आली आहे. महापालिकेच्या दवाखाना (Municipal Hospital) विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी (Medical Officer Dr. Ram Rawalani) यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील एका भागात तब्बल अकरा रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांची प्रकृती चांगली असून उपचारानंतर ते घरीच आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली.

बुधवारी दि ३० नोव्हेंबर रोजी जळगाव महापालिकेत नवनियुक्त आयुक्त देवीदास पवार (Jalgaon Municipal Commissioner Devidas Pawar) यांनी महापालिका दवाखाना विभागाची बैठक घेत गोवर साथीबाबत जळगावातील स्थितीची माहिती त्यांनी घेतली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात गोवरचे अकरा रुग्ण आढळले आहेत. ज्या भागात लसीकरणाला नकार देण्यात येतो, त्या भागातील हे रुग्ण आहेत. रुग्ण आढळून आलेल्या भागात आरोग्‍य विभागातर्फे सर्व्हे सुरू आहे.

तसेच ज्या मुलांना गोवरची लस दिलेली नाही, त्या मुलांना गोवरची लस महापालिका वैद्यकीय विभागातर्फे देण्यात येत आहे. काही भागात नागरिक लसीकरण करण्यास नकार देत आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. लसीकरण झालेल्या मुलांना अधिकचा डोस देण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून आदेश येईल. त्यानुसार ते लसीकरण करण्यात येईल.

– डॉ. राम रावलानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.