राणा दाम्पत्याविरोधात कोर्टाकडून वॉरंट जारी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray)यांच्या निवासस्थानासमोरील हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) प्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्याविरोधात कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दोघांविरोधातही जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

हनुमान चालीसा प्रकरणानंतर राणा दाम्पत्याविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. काही दिवस तुरूंगात काढल्यानंतर कोर्टाने दोघांचाही जामीन मंजूर केला होता. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या होत्या.

न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले होते. त्याचबरोबर सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याची अटही त्यांना घालण्यात आली.

दरम्यान, राणा दाम्पत्याला 11 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिलेले असतानाही ते सतत गैरहजर राहिल्यानं अखेर कोर्टानं जारी केलं आहे. सदरील वॉरंट हे जामीनपात्र असून 5 हजार रुपयांच्या जामीनावावर वॉरंट रद्द करता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.