विवाहितेने तळहातावर सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

एक वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने तळहातावर सुसाईड नोट लिहून मृत्यूला कवटाळले. महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी महिलेचा पती आणि सासऱ्याला अटक केली आहे. हे प्रकरण मुंबईला लागून असलेल्या नालासोपारा येथील आहे. पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेने तिच्या तळहातावर लिहिले की, माझ्या मृत्यूला तिचा नवरा, सासू, सासरे आणि वहिनी जबाबदार आहेत. 24 वर्षीय विवाहित संगीता कनोजिया हिने आपल्या तळहातावर ही सुसाईड नोट लिहून मृत्यूला कवटाळले. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप विवाहितेचा भाऊ आणि वडिलांनी केला आहे.

विवाहितेने सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे आपल्या तळहातावर लिहिले होते. माझ्या मृत्यूला माझे पती, सासू, सासरे आणि वहिनी जबाबदार असतील.

गेल्या वर्षी 2022 मध्ये संगीताचा विवाह नालासोपारा येथील नितीश कुमार कनोजियासोबत झाला होता. संगीताच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तिचे सासरचे लोक तिला अनेक दिवसांपासून त्रास देत होते. हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करत असत. योग्य आहार न दिल्याने कंटाळून संगीताने हे पाऊल उचलले.

मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी पती आणि सासऱ्याला अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.