विवाहितेचा दहा लाखासाठी छळ; आठ जणांवर गुन्हा दाखल

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह आठ जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील माहेर असलेल्या प्रियंका विनय थोरात (वय २८) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील साक्री येथील विनय शिवप्रसाद थोरात यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्न झाल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती विनय थोरात याने विवाहितेला माहेरहून १० लाख रूपये उद्योगधंद्यासाठी आणावे अशी मागणी केली. परंतू आईवडीलांची परिस्थीती हालखीची असल्याने पैशांची पुर्तता करू शकली नसल्याचे पतीकडून सतत शिवीगाळ व मानसिक छळ सुरू झाला. हा छळाला कंटाळून विवाहिता मोहरी निघून आल्या.

दरम्यान प्रियंका थोरात यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती विनय थोरात, सासु सुनिता शिवप्रसाद थोरात, दीर प्रणव शिवप्रसाद थोरात, आजल सासू सुमित्रा भास्कर थोरात सर्व रा. साक्री धुळे, आतेसासू पुष्पलता जगदीश विभांडीक रा. महाबळ ता.जि.जळगाव, आतेसासू अनिता उर्फ शोभा रविंद्र सराफ रा. गांधी चौक, पाचोरा, आतेसासू प्रमोदिनी उर्फ छाया संजयशेठ पोतदार रा. मुंबई, आतेसासू वैशाली भरत वानखेड रा. जुने धुळे आणि पतीचा जवळचा मित्र राहूल हसमुखलाल जैयस्वाल रा. साक्री यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल अहिरे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.