सावधान.. सुकामेवा खाताय ? पिस्त्याच्या जागी सडके शेंगदाणे..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नागपूर : सुकामेवा आणि मिठाई सर्वांच्या आवडीची असते. सोनपापडी, पेढा, बर्फी, लाडूसारख्या अनेक मिठायांवर पिस्ता किंवा बदाम या महागड्या सुकामेव्याची कात्रण (चिप्स) सजावट तसेच चवीसाठी लावली जाते.

मात्र, सुकामेवाचे दर बरेच जास्त आहेत. काही भेसळखोरांनी अनोखी शकल लढवत शेंगदाण्यातून पिस्ता आणि बदामसारख्या महागड्या सुकामेव्याच्या कात्रण तयार करणे सुरु केले. त्यांचे हे उद्योग अनेक महिने राजरोसपणे सुरू होते. दरम्यान काही दक्ष नागरिकांनी त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. आणि सर्व प्रकार उघडकीस आला.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमांप्रमाणे ही शुद्ध भेसळ असून ग्राहकांची फसवणूकही आहे. म्हणून सुकामेवा खात असाल तर सावध व्हा. खरचं ड्राय फ्रूट्स मिळतात की नाही, याची शहानिशा करा.

621 किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त

शेंगदाण्याला घातक रंगाने रंगवण्यात येत होते. त्याची कात्रण ( चिप्स ) करून ती मिठायांमध्ये वापरण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता. अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा घातलेल्या इमारतीतून तब्बल 621 किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केला. नागपुरातील कोणकोणते मिठाईवाले याचा वापर करत होते याचा तपास आता सुरु करण्यात आला आहे. चाळणीमध्ये स्वच्छ करून उन्हात सुकवून ठेवले जायचे. पिस्तासारखा दिसणारा हा पदार्थ पिस्ता नाही, तर हा शेंगदाणा आहे. नागपुरात काही भेसळखोरांनी नव्वद रुपये किलोच्या सडक्या शेंगदाण्याला रंगवेल. सुकवून त्याला पंधराशे रुपये किलोच्या पिस्तासारखा बनवण्याचा उद्योगच सुरु केला.

शंभर रुपये किलोचा शेंगदाणे पंधराशे रुपये किलो

नागपूरच्या बाबा रामसुमेरनगर परिसरातील एका इमारतीत हा गोरखधंदा सुरू होता. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी पोहोचले. तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर शेंगदाण्याला घातक हिरव्या रंगात रंगवले जात होते. पिस्तासारखे बनवण्याचे प्रकार उघडकीस आले. शेंगदाण्याला हिरव्या आणि लाल रंगात रंगवून, उन्हात अनेक दिवस सुकवून ठेवले जायचे. चाळणीने स्वच्छ करून पिस्ता किंवा बदाम सारखे बनवले जायचे. नंतर मशीनने त्याची कात्रण (चिप्स) करून नव्वद रुपये किलोच्या शेंगदाण्याची कात्रण बाजारात पंधराशे ते सतराशे रुपये किलोने पिस्ता किंवा बदामाची कात्रण विकले जायचे. मिठाई उत्पादकांना अशा बोगस पिस्त्याची विक्री केली जायची.

Leave A Reply

Your email address will not be published.