शेतकऱ्याला दोन जणांनी केली बेदम मारहाण

0

भुसावळ ;- शेतातील सामाईक ट्यूबवेलच्या पाण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला दोन जणांनी लाकडी काठी व फावड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारात घडला आहे. याप्रकरणी जणांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील बहिरूंबा बाबा मंदीराजवळ राजेंद्र यादव बावस्कर वय ५२ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात.बुधवार १७ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता ते वांजोळा शिवारातील शेत गट क्रमांक ५७ मधील त्यांच्या शेतात सामाईक ट्यूबवेलमधून पिकांना पाणी भरत होते.

त्यावेळी रविंद्र यादव बावस्कर आणि पंकज रविंद्र बावस्कर दोन्ही रा. खळवाडी, भुसावळ यांनी सामाईक ट्यूबवेलवरून पाणी भरत असल्याच्या कारणावरून लाकडी काठी आणि फावड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र बावस्कर हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दुपारी ५ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वाल्मिक सोनवणे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.