चक्क…पार्ले-जी बिस्किटांपासून बनवली राम मंदिराची प्रतिकृती (व्हिडिओ)

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. संपूर्ण देशभरातील जनता या ऐतिहासिक दिवसाची प्रतीक्षा करत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं आहे. २२ जानेवारीला जरी अयोध्येत रामभक्तांची तुफान गर्दी होणार असली तरी, त्यानंतरही अयोध्येत जाऊन नव्याने बांधलेलं राम मंदिर पाहण्यासाठी अनेकांनी प्लॅन्स केले आहे. तर, काहीजण अनोख्या पद्धतीने प्रभू श्रीराम यांच्याप्रती आपली भक्ती दाखवत आहे. अशातच पश्चिम बंगालच्या एका तरुणाने असा कलाविष्कार दाखवला आहे, जो पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Durgapur Times (@durgapur_times)

 

या तरुणाने पार्ले-जी बिस्किटांपासून राम मंदिराची छोटी प्रतिकृती बनवली आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिस्किटांपासून राम मंदिराची प्रतिकृती बनवणाऱ्या या तरुणाचं नाव छोटन घोष कसा आहे. चार बाय चार फुटाची ही प्रतिकृती बनविण्यासाठी त्यांनी २० किलो पार्ले-जी बिस्किटांचा वापर केला. तर हे मंदिर बनवण्यासाठी त्याला पाच दिवस लागले. या प्रतिकृतीमध्ये बिस्किटांसोबतच थर्माकोल प्लायवूड आणि डिंकाचा वापर केला गेला आहे. हे प्रतिकृती इतकी सुंदर बनवली आहे की, त्यावर नेटकरांकडून लाईक आणि कमेंट्स वर्षा होत आहे.

तीन दिवसांपूर्वी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. त्याला आत्तापर्यंत जवळपास दोन कोटींपेक्षा जास्त दिवस आणि २६ लाख आणून अधिक लाईक्स आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.