सातपुड्यातील मनुदेवीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल तालुक्यातील चिंचोली गावापासून उत्तरेला सातपुड्याच्या पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेला मनुदेवीचा धबधबा हा पर्यटकांना भुरळ घालतोय. सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून सातपुड्याच्या परिसरात असलेले मनुदेवी मंदिराचा धबधबा व ओंसडून वाहत आहे. हा धबधबा सुरू झाला की जिल्ह्यातील व महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून भाविक व पर्यटक मनुदेवीचा धबधबा पाहण्यासाठी येत असतात.

शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची व भाविकांची गर्दी दिसून येते. सध्या सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांमधून वाहत येणाऱ्या या पावसात दगड गोटे माती व लाकडाचे ओडके धबधब्याच्या पाण्यासोबत वाहत येत असल्याने धबधबाकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील सातपुड्यातील श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरातील आकर्षणाचे केंद्र असलेला धबधबा हा सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी सुरू असून भाविकांनी व पर्यटकांनी मनुदेवी धबधबा खाली व जवळपास आंघोळीसाठी जावु नये असे आवाहन मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. दि.१८ सोमवार पासून रोजी सातपुड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असुन, कोठवाय नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे पर्यटक व भाविकांनी आपली वाहने नदीपात्रातुन नेतांना पावसाच्या पाण्याचा अंदाज पाहुनच प्रवास करावा. कारण नदीला पूर आल्याने रस्त्यावर दगड गोटे व खड्डे निर्माण होण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी हलगर्जीपणा करू नये असे आवाहन ही मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.