मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ताब्यात

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी  शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील बाळकृष्ण ढाकणे या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

31 ऑगस्ट गुरुवार दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास बाळकृष्ण ढाकणे याने 112 वर फोन करून मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, असं म्हणत मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. हा कॉल बाळकृष्ण ढाकणे याने केल्याची माहिती समोर आल्यानंतर शेवगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

ढाकणे याने पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून फोन केल्याने त्याला पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बाळकृष्ण ढाकणे याने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ढाकणे हा स्पर्धा परीक्षा देत असल्याचीही माहिती आहे.

या घटनेनंतर मंत्रालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. सर्व पोलीस प्रशासन सतर्क झालं होतं. निनावी कॉल आल्याच्या काही वेळातच पोलिसांनी मंत्रालयात शोधमोहीम सुरू केली होती. मंत्रालयामध्ये डॉग स्क्वॉड द्वारे पोलीसानी मंत्रालयातील कानाकोपरा तपासाला. तपासाअंती बॉम्ब ठेवल्याची माहिती अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.