धावत्या रेल्वेखाली ५५ वर्षीय इसमाची आत्महत्या

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

धावत्या प्रवाशी रेल्वेखाली गोंडगाव ता. भडगाव येथील ५५ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना ३१ आॅगस्ट रोजी रात्रीच्या १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा लोहमार्ग दुरक्षेत्राच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक यांनी माहिती दिली की, कजगाव रेल्वे स्थानका समोर रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३४६ / २३ नजीक डाऊन ट्रॅकवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार हे रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांचेसह कजगाव रेल्वे स्थानकावर जावुन घटनास्थळाचा पंचनामा केला असता मयताचे खिशात आधारकार्ड मिळुन आले.

मयताचे नाव उत्तम आनंदा पाटील (वय ५५, रा. गोंडगाव ता. भडगाव) असे निष्पन्न झाले. उत्तम पाटील यांनी भरधाव वेगाने धावणाऱ्या जनता एक्सप्रेस क्रं. १३२०२ च्या इंजिन समोर स्व:ताला झोकुन देत आत्महत्या केल्याचे तपासा अंती निष्पन्न झाले आहे. तशी माहिती जनता एक्सप्रेसचे लोकोपायलट यांनी कजगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन उपप्रबंधक यांना वाॅकी टाॅकी द्वारे दिली होती.

उत्तम पाटील यांचा मृतदेह रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असुन घटने प्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे पोलिस निरीक्षक किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार हे करीत आहे. उत्तम आनंदा पाटील यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.