१० लाखांसाठी विवाहितेचा छळ, चौघांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शेती आणि घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी जळगावमधील विद्यानगर येथे माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांवर ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील विद्यानगरातील कविता हेमंत सोळुंखे (वय ३६) यांचा विवाह चोपडा तालुक्यातील देवगाव पारगाव येथील हेमंत प्रमोद सोळुंखे याच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर कविता हिने तिच्या माहेरून घराचे कर्ज फेडण्यासाठी तसेच शेती घेण्यासाठी १० रुपये आणावेत अशी मागणी तिच्या पतीसह सासरच्या मंडळींनी कविताकडे केली.

यावरून वेळावेळी कविताला शिवीगाळ आणि मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ केला. दरम्यान या छळाला कंटाळून कविता गुरुवारी ३१ ऑगस्ट रोजी माहेरी निघून आली व तिने याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन तिचे पती हेमंत सोळुंखे, सासू छाया प्रमोद सोळुंखे, प्रमोद विठ्ठल सोळंखे, नणंद पल्लवी प्रमोद साळुंखे सर्व रा. देवगाव पारगाव ता चोपडा या चार जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.