जळगावातील ५१९ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा डिसेंबरमध्ये होणार लिलाव

0

जळगाव :डिसेंबर महिन्यात १९ ते २१ डिसेंबर दरम्यान शहरातील ५१९ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या मालमत्तधारकांना जप्तीचे आधिपत्र बजाविण्यात आले आहेत. परंतु तरीही सदर मालमत्ताधारकांकडून मालमत्तांकर व पाणी पट्टीची थकबाकी भरली जात नसल्यामुळे त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे नियोजन मनपा प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती मनपाचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी दिली.

महापालिकेने तीन वर्षांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कर व पाणी पट्टी भरण्याचे आवाहन केले होते. परंतु वारंवार आवाहन करून देखील मालमत्ता धारकांकडून थकबाकीभरली जात नसल्यामुळे त्यांना मालमत्ता जप्तीचे अधिपत्रबजाविण्यात आले होते. मात्र, तरी देखील त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सदर थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. यात ५१९ थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रातून प्रसिध्द करण्यात आले असून त्यांनी तातडीने थकबाकीचा भरणा न केल्यास दि.१९ ते २१ डिसेंबर दरम्यान, त्यांच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.

लिलावात कोणी बोली न लावल्यासआयुक्तांकडून एक रुपयांचीनाममात्र बोली लावण्यात येईल व सदर मालमत्ता महापालिकेच्या नावावर केली जाणार आहे.महापालिका प्रशासनाकडून तीन वर्षांपेक्षा जास्त वर्षांची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची नावे वृत्तपत्रांतून प्रसिध्द करण्यात आली आहेत. पहिल्या टप्यात ११९ थकबाकीदारांची तर, दुसऱ्या टप्यात २०० मालमत्ता धारकांची, तसेच तिसऱ्या टप्यात पुन्हा २०० मालमत्ता धारकांची नावे प्रसिध्द करण्यात आली आहे. या सर्व ५१९ मालमत्ता धारकांच्या मालमत्तांचा लिलाव हा डिसेंबर महिन्यात करण्याचे नियोजन मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.