लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले ; एकविरुद्ध गुन्हा

0

जळगाव :- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली. असून याप्रकरणी रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका परिसरात अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा विवेक उर्फ बॉबी विजय सोनवणे याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत कुटुंबाच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. पिडीत मुलीच्या नातेवाईकांना घटना समजल्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्याबाबत कोोतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात विवेक उर्फ बॉबी यानेच मुलीला फूस लावून पळवून नेले आहे अशी तक्रार दिली आहे. त्यानुसार बुधवारी रात्री संशयित विवेक उर्फ बॉबी विजय सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.