बेसमेंटच्या जागी व्यावसायिक वापर ; मनपाकडून पाच दुकाने सील

0

जळगाव ;-बेसमेंटच्या जागी व्यावसायिक वापर करणाऱ्या दुकानदारांविरूध्द मनपा प्रशासनाने गुरुवारी नेहरू चौक ते टॉवर चौक रस्त्यावरील ५ दुकानांना सील ठोकण्याची कारवाई केली. यापुढेही टप्याटप्याने बेसमेंटचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांची दुकाने व हॉस्पिटल सील करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली.

मनपा प्रशासक आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी गुरुवारी अतिक्रमण विभाग व नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला आदेश देत ५ दुकाने सील केल्याची कारवाई केली. यात महापालिकेचा नगररचना विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून गुरुवारी झालेल्या कारवाईत मनपा समोरील अजय ललवाणी यांचे दिपक शुज, रेखा वाणी यांचे टायझर, निलेश नाथानी यांचे शितल कलेक्शन, विमलबाई जोशी यांचे कॉम्ब, रितेश कौराणीयांचे सेलिब्रेशन आदी पाच दुकाने सीलबंद करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.