गुडन्यूज ! सोने-चांदीच्या भावात सलग घसरण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या भावात प्रचंड वाढ पाहायला मिळाली. आता सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी गुडन्यूज असून सलग दुसऱ्या दिवशी किंमतीत घसरण झाली. दोन दिवसांत किंमती घसरल्याने ग्राहकांना खरेदीची संधी चालून आली आहे.

डिसेंबर महिन्यात सोन्याने दरवाढीचा नवीन उच्चांक गाठला होता. सोने जवळपास 66 हजारांच्या जवळपास पोहचले होते. 2 जानेवारी 2024 रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. तर 3 जानेवारीला भाव 270 रुपयांनी घसरले. 4 जानेवारी रोजी भाव 440 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात चांदी जोरदार उसळली.  2 जानेवारी 2024 रोजी चांदीचा दर 300 रुपयांनी वधारला. तर 3 जानेवारी रोजी 300 रुपयांनी किंमती घसरल्या. 4 जानेवारी रोजी भाव 2000 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,600 रुपये आहे.

जळगाव शहरातील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचा सोन्याचा दर 62,670 रुपये आहे. तर चांदीचा आजचा भाव 72,300 रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.