जिवलग मित्राचे ‘मनोज जरांगे’वर गंभीर आरोप

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झाली. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही, असं मनोज जरांगे यांचा अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

मनोज जरांगे हा नाटकी माणूस आहे. त्याचा मिटिंग रात्री होतात. वाशीला आंदोलन करण्यासाठी पोहोचले त्या रात्री पुन्हा गुप्त मिटिंग केला. अधिसूचनेत म्हंटल हे १६ तारखेला लागू होईल. पण त्याची इच्छा होती, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं येऊन मला पाणी पाजावं. जरांगेला फक्त श्रेय हवं. जेसीबीतून फुलं हवीत कार्यक्रम हवेत. आरक्षण गरिबाला हवंच आहे. पण याचं काय? याला तर फक्त श्रेय हवं आहे, असं म्हणत अजय महाराज बरासकर यांनी जरांगेंच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.