सारख्या नावाचे व्यक्ती उभ्या करून बळकावल्या जमीन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतीच्या बनावट कागदपत्रांवर सारख्या नावाचा व्यक्ती उभी करून जमीन परस्पर खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२०) समोर आला. ५ संशयितांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड येथील रामदास भगवानदास पेसवानी यांनी वर्ष २०११ मध्ये नशिराबाद शिवारात शेतजमीन खरेदी केली होती. त्यांनी तेथे चारही बाजूला तारेचे कुंपण करून त्यांच्या नावाचा फलक लावला होता.

या शेतजमिनींपैकी १२ आर जमीन ही राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादित झाली असून, त्याचा मोबदला पेसवानी यांना अद्याप मिळालेला नाही. डिसेंबर २०२३ मध्ये

त्यात पेसवाणी यांना हृदयविकाराचा झटका आला. यांच्यावर उपचार सुरु आहे. शेतजमीनीची खात्री करण्यासाठी पेसवाणी यांचे भाऊ अजय पेसवाणी हे १६ जानेवारी रोजी नशिराबाद येथे गेले असता यावेळी त्यांच्या भावाच्या जमिनीवर हॉटेलचा फलक दिसला.

पेसवाणी यांनी वकिलामार्फत संबंधित कार्यालयात जाऊन त्या जमिनीच्या कागदपत्रांची नक्कल काढली असता यामध्ये रामदास पेसवाणी यांच्या नावामध्ये साधर्म्य असणाऱ्या चाळीसगाव येथील बनावट व्यक्तींसह १८ ते २०२२ रोजी खरेदी खत केले असल्याचे आढळून आले.

त्यावर साक्षीदार म्हणून जळगावातील दोन साक्षीदारांच्या स्वाक्षरी आहेत. जमीन हडपण्यासाठी पाच जणांनी संगनमताने बनावट कागदपत्रांसह जमिनीचे बनावट मालक उभा करून केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.