महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ‘मनोहर जोशी’ यांचे निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झालं. आज दिनांक 23 रोजी पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी हिंदूंजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रूपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत ठेवण्यात येणार आहे. दुपारी दोन नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.

माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्यावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.