मंगळग्रह सेवा संस्था : श्री तुलसी विवाह महासोहळ्यानिमित्त मूर्तींच्या शोभायात्रेसह वृक्षदिंडी

0

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे रविवार, २६ नोव्हेंबर रोजी श्री मंगळग्रह मंदिरात होणाऱ्या श्री तुलसी विवाह महासोहळ्यानिमित्त शनिवार, २५ रोजी श्री भैरवनाथजी, श्री जोगेश्वरी माता व श्री गुरुदत्त यांच्या मूर्तींसह वर राजा भगवान विष्णूजी व वर राणी माता श्री तुलसीदेवी यांच्या प्रतिमांची भव्य शोभायात्रा तसेच पर्यावरणाच्या जनजागरासाठी वृक्षदिंडी काढण्यात आली.

संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थानापासून सकाळी ९ वाजता मानकरी निवृत्त महसूल आयुक्त तथा सदस्य (महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य) ज्ञानेश्वर राजूरकर, माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख-ग्रामीण (उ.बा. ठा. गट) गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख- महानगर विष्णू भंगाळे, सातपुडा ऑटोमोबाईल्सचे संस्थापक प्रा. डी. डी. बच्छाव, पाडळसरे धरण समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी सपत्नीक, तर अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. निलेश चौधरी, ॲड. प्रदीप महाजन, ॲड. रमाकांत पाटील, ॲड. शशिकांत पाटील, सहसंचालक ॲड. सुनील चोरडिया, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, रंजना देशमुख यांनी विविध मूर्तींचे विधिवत मंत्रोपचाराने प्रथम पूजन होऊन शोभायात्रा तसेच वृक्षदिंडीचा प्रांरभ होऊन ती मार्गस्थ झाली.

शोभायात्रा व वृक्षदिंडीत असलेले विविध मूर्तींचे आकर्षक पद्धतीने सजविलेले रथ, नाशिक येथील देशासह परदेशातही गाजलेले तरुण-तरुणींचे आणि कसरतींयुक्त गुलालवाडी ढोलपथक, मुंबईतील निशा मोकल यांचा म्युझिकल ग्रुप, वारकऱ्यांचे भजनी मंडळ आणि डोक्यावर कलश व तुलसी वृंदावन घेऊन नऊवारी तसेच भारतीय पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या माता-भगिनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रा मार्गावर ढोलपथकाकडून विविध कसरतींयुक्त ढोलचा गजर करण्यात आला, म्युझिकल ग्रुपतर्फे विविध देव-देवतांचे स्मरण करणारी भक्तिगीते, भावगीते सादर झाली. तर वारकऱ्यांच्या भजनी मंडळाकडून हरिनामाचा गजर करण्यात आला. शोभायात्रा व वृक्षदिंडी मार्गावरील घरांसमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच ठिकठिकाणी मूर्तींसह शोभायात्रेतील भाविक व माता-भगिनींवर पुष्पवृष्टी झाली. यावेळी ठिकठिकाणी शहरातील नागरिकांकडून शोभायात्रेत सहभागी झालेल्यांना पाणी, चॉकलेट, बिस्कीट, कोल्ड्रिंक्स, फळे, सरबत आदींचे वाटप करण्यात आले.

सराफ बाजार- दगडी दरवाजा- तिरंगा चौक-कोंबडी बाजार- नगरपालिकेच्या पाठीमागून सुभाष चौक-राणी लक्ष्मीबाई चौक-मोठा बाजार- फरशी पूल-चोपडा नाका मार्गाने शोभायात्रा श्री मंगळग्रह मंदिरात आल्यानंतर सांगता झाली. शोभायात्रेत विजय शॉपीचे संचालक विजय माहेश्वरी, सुजाण कलेक्शनचे रमेश जीवनानी, जी. एस. हायस्कूलचे पर्यवेक्ष एस. बी. निकम, मुख्याध्यापक बी. एस. पाटील, माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील (भूतबापू), काँग्रेसचे महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे सचिव आशुतोष पवार, कॉंग्रेसचे अमळनेर तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, महिला तालुकाध्यक्षा सुलोचना वाघ, ॲड. ललिता पाटील, बी. के. सूर्यवंशी, खा. शि. मंडळाचे माजी संचालक बजरंग अग्रवाल, अमळनेर तालुका क्रीडाशिक्षक सुनील वाघ, अमळनेरचे माजी शिवसेना तालुकाध्यक्ष विजय पाटील, कल्याण पाटील, सूरश्री वैद्य, मोतीलाल महाजन, सेवानिवृत्त तहसीलदार रतीलाल चव्हाण, साने गुरुजी विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, अरविंद मुठे, कपील मुठे, काँग्रेस नेते मुन्ना शर्मा, बबली पाठक, डॉ. रवींद्र जैन, माजी नगरसेवक पंकज चौधरी, किरण गोसावी, प्रा. एम. बी. चव्हाण, सूरज परदेशी, बाळासाहेब नेरकर, शिवसेनेचे (उ.बा.ठा. गट) श्रीकांत पाटील, धनदाई शिक्षण संस्थेचे सचिव के. डी. पाटील, निखिल पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. जैन, लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलीप गांधी, खा. शि. मंडळाचे संचालक योगेश मुंदडे, नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन, पंकज मुंदडे, डॉ. मिलिंद नवसारीकर, प्रशांत सिंघवी, प्रकाश शहा, मनीष जोशी, विनोद अग्रवाल, जितेंद्र पारख, राजेंद्र नांढा, प्रभाकर कोठावदे, महेश कोठावदे, भैय्यासाहेब मगर, विनोद जाधव, के. पी. पाटील, रवींद्रसिंग कालरा, प्रीतपालसिंग बग्गा, चेलाराम सैनानी, राजेंद्र वर्मा, अर्बन बँकेचे संचालक प्रवीण जैन, भरत ललवाणी, माजी नगरसेवक लालचंद सैनानी, दिनेश नाईक, शीतल देशमुख, ॲड. सुरेश सोनवणे, कीर्तीकुमार कोठारी, चंद्रकांत महाजन, अनिल रायसोनी, पंकज दुसाने, दीपक भोई, चेतन राजपूत, जी. एस. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस. बी. बैसाणे, डी. एच. ठाकूर, सुधाकर देशमुख, जे. व्ही. बाविस्कर, जी. एस. चौधरी, एम. जी. पाटील, ए. डी. भदाणे, व्ही. व्ही. कुलकर्णी, राहुल पाटील, सोनजे, उमाकांत हिरे, शिंगाणे सर, गजानन पाठक, हेमंत महाजन, नितीन पाटील, आशू नॉव्हेल्टीजचे विशाल शर्मा, अशोक माधवाणी, बाळू कोठारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रतीक जैन, अभिजित भांडारकर, अनिल शिसोदे, प्रा. एन. ए. पाटील, वाल्मीक मराठे, विनोद कदम, बाळा पवार, आनंद महाले, निलेश महाजन, संदीप भामरे, वाल्मीक बारी, पत्रकार उमेश धनराळे, जयंतलाल वानखेडे, जयेश काटे, उमेश काटे, दिनेश पालवे, जितेंद्र पाटील यांच्यासह अमळनेर पोलीस प्रशासनातील पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, हवालदार चंद्रकांत पाटील, शरद पाटील, संजय पाटील, पुरुषोत्तम वाल्डे, हिरालाल पाटील, विलास बागूल, राजेंद्र कोठावदे, नम्रता जरे, महिला मंडळाच्या आशा महाले, शिरोडे, मंदाकिनी कोठावदे, पुष्पा भामरे, उज्ज्वला शहा, द्रौ. रा. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सूर्यवंशी आदींसह जी. एस. हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, छात्रसेनेचे विद्यार्थी, तसेच शहरातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, सौ. जयश्री साबे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी यांनी पौरोहित्य केले. शोभायात्रा यशस्वितेसाठी मंगल सेवेक-यांनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.