खडकपूर्णा नदीपात्रात रेती नसल्याने पाणीपातळी खालावली

0

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क

मोठया प्रमाणात महसुल देणारी कामधेनू खडकपूर्णा नदीपात्रातील पाणीसाठा ठेवणारी रेती महसूल विभाग आणि देऊळगाव मही पोलीस चौकीत कार्यरत असलेला अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या अनाधिकृत रेती चोरी प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी राजकीय बाहुले न बनता धडक करवाई आणि फौजदारी दाखल करण्याचे आदेश द्यावेत.

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा सिंदखेडराजा लोणार या तिन्ही तालुक्यातील तहसिलला सुरवातीला करोडो रुपये हराशी च्या माध्यमातून देणारी खडकपूर्णा नावाची कामधेनू नदी आणि त्या नदीपात्रातील होणारा मर्यादित रेती उपसा जील्ह्याच्या विकासास हातभार लावणारा ठरत होता. मात्र जेंव्हा पांढऱ्या कपड्यातील काळे कर्तुत्व करणारे आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि राजकिय पक्षाचे पदाधिकारी हे अप्रत्यक्षरीत्या रेती तस्करीच्या टोळीत सामील झाले.

कार्यकर्त्या करवी सहभाग नोंदवून वर्चस्व वाढविण्याच्या प्रयत्नात खडकपूर्णा कामधेनू केंव्हा मृत झाली कळलेच नाही. कडक खडक लागे पर्यंत ट्रॅक्टरवरील किनहीच्या साहाय्याने अनधिकृत रेती उपसा करत राहिले. परिणामी संबंधित गावाचा दळणवळण करणारा मजबूत रस्ता खड्डेमय होत होता. त्या गावाचा पाणीपुरवठा करणारी यंत्रणा कोरडी ठाण पडली, नदीकाठच्या विहिरीत पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना परिणाम भोगावे लागत आहे. प्रशासनास पाणीटंचाई सारखा सामना करावा लागतो. मागील कालावधीत जेवढे तहसीलदार कार्यरत होते. ते मालामाल होऊन गेले. सुरवातीला बदलून आलेला अधिकारी कडकपणा दाखवतो, मायाजाल बघताच मुलायम होतो. मग खिसे गरम करती आणू शासन गेले खड्डयात ही आतापर्यंतची पध्दत आहे.

नदीपात्र खडकाला लावून आता खडकपूर्णा धरणातील संत चोखा जलाशयात रेती उपसा करणारी अनधिकृत यंत्रणा कार्यरत असतांना कोणी तक्रार केल्यास पोलिसांसह महसूल विभागाकडून चोर सोडून संन्याशाला फाशी होते. यावर जिल्हाधिकारी किरण पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.