अंघोळ करताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू

0

जळगाव : आंघोळ करताना तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने तो बेशुद्ध होवून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी सकाळी कांचननगर परिसरात घडली. निलेश कमलाकर सोनवणे (वय ३७) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील कांचननगर परिसरात निलेश सोनवणे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. कापड दुकानात काम करुन तो कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. शनिवारी सकाळी निलेश हा अंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेला. याठिकाणी तो अचानक बेशुद्ध होवून पडलेला होता. ही घटना त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी निलेशला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निलेश यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.