थोरगव्हाण येथे एका तरूण शेतकऱ्याची आत्महत्या, वाचा सविस्तर

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील थोरगव्हाण गावातील राहणाऱ्या एका विवाहीत तरुणाने आपल्या शेतात गळफास घेवुन आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना घडली असुन पोलीस ठाण्यात या गुह्याची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, अतुल ईश्वर पाटील ( बेदारे ) वय २८ वर्ष राहणार थोरगव्हाण तालुका यावल यांनी दिनांक २० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास थोरगव्हाण शिवारातील आपल्या शेतातील बांदावर असलेल्या झाडास ठीबक नळीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटनासमोर आली आहे . अतुल ईश्वर पाटील (बेदारे) यांने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात अतुल ईश्वर पाटीलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची खबर भारत चावदस पाटील यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. आत्महत्या केलेल्या तरूणास आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असे कुटुंब आहे

Leave A Reply

Your email address will not be published.