अखेर एकनाथ खडसेंच्या जावईस जामीन मंजूर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना अखेर जमीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना जमीन मंजूर केला असून, शिरीष चौधरी यांना लॉनड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीने अटक केली होती. पुणे एमआयडीसी भूखंड घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गेले दीड वर्षांपासून ईडीच्या ताब्यात होते.

दरम्यान, हे प्रकरण २०१६ मधील असून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे (Manda Khadse), जावई गिरीश चौधरी, यांच्या नावाने भोसरी येथे एमआयडीसीमध्ये जागा खरेदी केल्याचा आरोप होता. याप्रकरणी झोटिंग समिती नेमण्यात आली होती. फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असतांना त्यांनी पुण्यातील भोसरीमध्ये ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. रेडी रेकर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये तो अधिग्रहण केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.