विद्युत खांब चोरी करणाऱ्या दोघास अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वरणगांव-भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव (Pimpalgaon) खु येथील शेती शिवारातील दोन लोखंडी विद्दुत खाब चोरी करणाऱ्याना दोघाना पोलिसांनी अटक केली. याबाबत तालुक्यातील पिपळगाव शेती शिवारातील शेतकरी संजय इंगळे यांच्या बाधाला लागुन असलेले लोखंडी विजेचे दोन 20 फुट लांबीचा ११८०० किंमतीचे खांब कापुन चोरी केल्याचे विज कर्मचारी संजय धनगर शेतीची विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले असता त्याच्यां खांब चोरी गेल्याने लक्षात आले.

याबाबत वरणगांव पोलीस स्टेशनला विज कर्मचारी संजय धनगर यांच्या फिर्यादी नुसार संशयित आरोपी लेकेश दत्तु चौधरी, कैलास रणजीत मान ठाकुर दोघ राहाणार पिपळगांव खु ॥ यांच्या विरोधात भादवी कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करूण अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो हे कॉ मनोहर पाटील करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.