जळगावचे रहिवासी एरंडोल बसस्थानकावरून बेपत्ता…

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव येथून धुळे जात असलेले पती-पत्नी बस एरंडोल बसस्थानकावर थांबतच पती लघुशंका करून येतो असे सांगून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथील विश्रामनगर येथील नंदा रेसिडन्सी मधील रहिवासी व्यंकटेश कालिदास कुलकर्णी (४९) हे पत्नी अरुंधती कुलकर्णी यांचेसह जळगाव येथून धुळे येथे बसने जात होते. एरंडोल येथील बसस्थानकावर बस थांबली असता, पती व्यंकटेश कुलकर्णी यांनी पत्नीला मी लघुशंका करून येतो असे सांगून बसमधून उतरले. बराच वेळ झाला तरी पती व्यंकटेश कुलकर्णी परत न आल्यामुळे अरुंधती कुलकर्णी यांनी त्यांचा बसस्थानक परिसरात शोध घेतला, तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र ते सापडले नाहीत. याबाबत अरुंधती कुलकर्णी यांनी पोलीस स्थानकात पती हरवल्याची तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करीत आहेत. व्यंकटेश कुलकर्णी यांचा रंग गोरा असून मध्यम बांधा आहे. डोक्यावर बारीक केस असून त्यांची उंची पाच फुट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.