जातीय हिंसाचार भडकवणारा जय भीम अँपवर बंदी घाला -करण झणके

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मलकापूर; जय भीम हे अभिवादन हे बौद्ध, दलित, आदिवासी, शोषित, पिडित किंवा मागांस समाजातील लोकांसाठी अस्मितेचे व क्रांतिचे प्रतिक बनलेले आहे. हे अभिवादन आपल्या मूळ अर्थाने धार्मिक स्वरूपाचे नसून याला धार्मिक रूपात कधीही मानले गेले नाही पण जवळजवळ सर्वच भारतीय बौद्ध हे आंबेडकरवादी असल्यामुळे याला भारतीय बौद्ध अनुयायांचा अभिवादन वा प्रतिक शब्द आता मानला जातो. जय भीम हा शब्द डॉ.

आंबेडकर व त्यांच्या विचारांप्रती सन्मानाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. हे शब्द स्वाभिमान आणि सन्मानाने अभिवाद वा शुभेच्छा आहेत, जे याचा उच्चार करतात त्यांना प्रोत्साहन मिळते. कोट्यवधी भारतीय व्यक्ती, राष्ट्रीय नेते ‘जय भीम’चा नारा देतात.जगभरातील आंबेडकरवादी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी आणि बाबासाहेबांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी “जय भीम” हा शब्द आदराने व अभिमानाने उच्चारतात.

‘जयभीम’ या प्रेरणादायी शब्दाची सुरूवात बाबासाहेबांचे पक्के अनुयायी असलेल्या एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३५ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९३९ पासून स्वतः बाबासाहेब ‘‘जय भीम’’ लिहू लागले आणि अभिवादन म्हणूनही जयभीम वापरू लागले तसेच अभिवादनाच्या उत्तरातही ते जयभीम वापरू लागले. हे स्पष्टीकरण देण्याचे कारण म्हणजे “जय भीम” या शब्धाशी संपूर्ण दलित व इतर समाजाची आस्था, श्रद्धा, अस्मिता जुळलेली आहे.

तरी जयभीम अँप मुळेसामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वर कार्यवाही करून अँप बंद करण्यात यावे असे निवेदन पत्रकार करण झनके यांनी ठाणेदार मलकापूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना सादर केले सदर निवेदनात पुढील मुद्दे उपस्थित झाले आहे,

सध्या moj, snapchat, instagram असे बरेच रील बनवणारे अँप्लिकेशन मार्केट मध्ये आहेत त्याच धर्तीवर जयभीम अँप सुद्धा निर्माण केले आहे इतर अँप प्रमाणे पैसे कमविणे आणि जास्तीत जास्त ” जयभीम” नावाचा वापर करून व्हीव्हर निर्माण करणे आहे. बाबा साहेब आंबेडकर विचारमंच नसून त्यांना विचारांची विटंबना करणारा अँप आहे.

सध्या त्या जयभीम अँप वरती  माकड उड्या मारणारे स्टार , ब्रा च्या पट्ट्या दाखवत नाचणाऱ्या मुली, cleves दाखवणाऱ्या मुली, गुंडगिरी आणि भाईगिरी करणारे मुले, तसेच शिवीगाळ, धमक्या चे रील शूट करणारे तथाकथित स्टार स्वतःची तसेच स्वतः च्या आई बापाची सुद्धा इज्जत वेशीवर टांगत आहेत. त्यामुळे समाजात द्वेषाचे वातावरण निर्माण होत आहे.

जयभीम अँप वरती फक्त बौद्ध, दलित, आदिवासी, शोषित, पिडित किंवा मागांस समाजातील लोक नसून संपूर्ण वेगवेगळे समाज वर्गातील लोक आहे ते विवादास्पद पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करत आहे.

अँप ला जयभीम नाव देऊन समाजात त्या अँप वरती विविध प्रकारे बेकायदेशीर भडकाऊ वातावरण निर्माण केले जात आहे जयभीम या संपूर्ण समाजाची आस्था  प्रेरणा देणाऱ्या असणाऱ्या शब्दाची दयनीय अवस्था केली आहे.

संपूर्ण दलित समाज  हा  जयभीम नावाखाली असला नंगानाच सहन करणार नाही. तसेच लवकरात लवकर जयभीम नाव हे अँप वरून काढण्यात यावे. अँप चे निर्माते गिरीश वानखेडे , विक्रम गायकवाड, प्रमोशन कर्ता – राहुल प्रधान हे जयभीम नावाचा गैरवापर करत असून अँप मुळे समाजामध्ये कोणताही तेढ, जातीय दंगल किंवा अनूचित प्रकार जर घडला त्यास अँप चे निर्माते व प्रमोशन कर्ता जबाबदार राहतील.

संपूर्ण अँप ची आय टी सेल च्या मार्फत चौकशी करून माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००५ नुसार योग्य ती कार्यवाही  करण्यात यावी.असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदनावर धीरज इंगळे, भीमराव इंगळे,रोशन चांदनशिव, स्वप्नील सुरडकर,गौरव सावळे,नीरज सोनोने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी महसूल उपविभागीय अधिकारी पोलीस तहसीलदार तथा शहर पोलीस निरीक्षक मलकापूर यांना दिले आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.