मालदीव मध्ये भारतीयांना ‘नो एन्ट्री’

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

भारतात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मालदीव (Maldives) मध्ये भारतीय लोकांना एन्ट्री नाही. आणि जर तुम्हाला बाहेर देशी फिरायच असेल तर, इजिप्त (Egypt), रशिया (Russia) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) हेच पर्याय उरले आहेत. सध्या तरी या देशांत भारतीय पर्यटकांना क्वारंटाइनचा नियम नाही. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग तीव्र असून, भारतात रुग्णांचे प्रमाण वाढते आहे. त्याची दखल घेत अनेक देशांनी सध्या भारतीय पर्यटकांना ‘नाे एंट्री’ केली असून, आता मालदीवही त्यात आला आहे. हिंदी महासागरात बेटांच्या स्वरूपात असलेला हा देश स्वच्छ समुद्र किनारे आणि निसर्गसाैंदर्यासाठी प्रसिद्ध असून, भारतीय पर्यटक तेथे माेठ्या संख्येने जातात. जानेवारी ते मे या काळात या देशात येणाऱ्या पर्यटकांमध्ये 21 टक्के भारतीय असतात. पण, 13 मेपासून या देशाने दक्षिण आशियातील पर्यटकांना येण्यास तात्पुरती बंदी घातली आहे.

काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये म्हणून सर्वताेपरी खबरदारी घेतली जात आहे. दक्षिण आफ्रिका सध्या खबरदारीच्या पहिल्या पातळीवर असला, तरी हाॅटेल आणि रेस्टाॅरंट सुरू आहेत,’ अशी माहिती दक्षिण आफ्रिकेच्या मुंबईतील वाणिज्य प्रतिनिधी आंद्रिया कुहेन (Andrea Kuehn) यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.