दिग्गज खेळाडूंचे ‘कुस्तीपटूंना समर्थन, वाचा सविस्तर

0

लोकशाही, न्यूज नेट्वपर्क

 

बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshi Malik), विनेश फोगट (Vinesh Phogat) यांच्यासह देशातील ७ नामवंत खेळाडूंनी गंभीर आरोप केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन (Jantar Mantar Aandolan) करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ (sexual harassment) केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.

 

त्याचप्रमाणे त्यांना समर्थन देण्यासाठी दिग्गज खेळाडूंनीही पाठिंबा दर्शविला आहे. टेनिसपटू सानिया मिर्झासह क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या पैलवानांची आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरूच आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयर दाखल करण्याची मागणी घेऊन पैलवानांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.