कोल्हापूरमध्ये १ ते १३ मे दरम्यान बंदी आदेश लागू

0

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) १ ते १३ मे दरम्यान जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे (District Magistrate Bhagwan Kamble) यांनी दिले. जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. शहरात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्यामुळे काहीही गालबोट लागेल असं कृत्य घडू नये त्यासाठी हि खबरदारी घेण्यात आली आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन धर्मात तेढ व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच पुढील काळात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरूस होणार असल्याने आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटसमुळे अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून १३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू राहील.

कोणकोणत्या गोष्टींवर असणार बंदी
शारीरिक इजा होईल असे शस्त्र, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ, उपकरणे हाताळण्यावर बंदी असेल. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमा होणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे यावर बंदी असेल. पण हा आदेश कर्तव्यावरील शासकीय अधिकारी, कर्मचारी, जातिधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रांना तसेच लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा यांना लागू नसेल.

Leave A Reply

Your email address will not be published.