होईल दुप्पट लाभ ! मकर संक्रांतीला करा ‘या’ गोष्टींचे दान

0

लोकशाही विशेष लेख 

 

यंदा १५ जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवसाला मकर संक्रांती हे नाव आहे. ही संक्रांती पौष मासात येते. यासोबतच काही गोष्टींचे दान करणे हिंदू शास्त्रमध्ये सांगितले आहे. हे दान केल्याने तुमची ग्रहस्थिती सुधारू शकते. तिळगूड, तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते.

तीळ:- मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो. यामुळे शनिदोष दूर होतो. याशिवाय भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करा.

कंबल :- मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला कंबल दान करा. असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब, असहाय्य, गरजू लोकांना काळे कंबल दान करा. लक्षात ठेवा हे कंबल वापरलेले नसावे.

गुळ:- गुळाचा संबंध गुरू ग्रहाशी आहे. मकर संक्रांत रविवारी येत आहे. या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरूचे स्थान मजबूत होते. गुरूच्या बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते. जीवनात सौभाग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते.

खिचडी:- मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्वाचे आहे. मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ, उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो, या गोष्टी शनि, बुध, सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहेत. या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा होते.

तूप:- मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरूशी आहे. मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरू बळकट होतात. हे दोन्ही ग्रह जीवनात यश, सुख, समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात.

उडदाची डाळ:- ज्योतिष शास्त्रात उडद हे शनि ग्रहाशी संबंधित मानले जाते. मकरसंक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकता. असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसातीचा त्रास होत आहे, त्यांना त्यातून आराम मिळू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.