धक्कादायक; लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये झाला अचानक गोळीबार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑर्केस्ट्रा बारमध्ये दारू पित असताना खुर्चीला धक्का लागल्याने दोन गटात वाद झाला आणि या वादातून एकाने थेट पिस्तूल काढून दुसऱ्या गटातील तरुणावर गोळी झाडली. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये ही घटना रात्री १.१५ च्या सुमारास घडली आहे. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बरेच लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार असून अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस काय पावले उचलतात हे आता पहावे लागेल.

लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये रात्रीच्या वेळीस अजय सिंग हा मित्रांसोबत दारू पिट होता. त्याच्याच बाजूला टेबलावर विकास भंडारी हा देखील आपल्या मित्रांसोबत दारू पीत बसला होता. पार्टी रंगात आली असताना खुर्चीला धक्का लागल्याने अजय सिंग व विकास भंडारी या दोघांमध्ये बॅड सुरु झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की सिंग याने संतापाच्या भरात आपल्या जवळील पिस्तुलाने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी विकासाच्या खांद्याला लागली. या हल्ल्यात विकास बचावला असला तरी जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर अजय सिंग व त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनाथली धाव घेत डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाने तपास सुरु केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.