घोडसगावजवळ दूध टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावजवळ भीषण अपघात झाला. रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दूध टाकत असतांना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांनी टँकरला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव जवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला.

दरम्यान या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली होती. यानुसार दुध शिफ्ट करण्याचे काम सुरू असतांना अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेल्या ट्रक त्या पाठोपाठ दोन कारने अशा चार ते पाच भरधाव वाहनांने दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झालेत.

अपघातग्रस्त वाहनांमध्ये क्रेन क्र. एम.एच.१८- बी.आर-६८३१, टँकर क्र. जी.जे. ०२ डब्लु ८८८७, टँकर क्र. जी.जे ०२ एक्स.एक्स. ९७५९ व ट्रक क्र. जी.जे. ३६ व्ही. ८९३९ या चार वाहनांचा अपघात घडला.

अपघातातील मयतांमध्ये पवन सुदाम चौधरी ( वय २५, रा. धुळे), धनराज बन्सीलाल पाटील (वय ४८, रा. बिलाडी, ता.जि.धुळे), भालचंद्र गुलाब पाटील (वय ३१, रा. बिलाडी), उमेश राजेंद्र सोळंके (वय ३५) सर्व राहणार धुळे, धनराज सुरेश सोनार (वय ३७, रा. जळगाव) यांचा समावेश आहे.

दरम्यान या अपघातात विजय अनिल पाटील (वय २६, रा. बिलाडी, ता.जि.धुळे), मुरलीधर प्रल्हाद काबरे (वय ५१, रा. नशिराबाद), चालक गुड्डु उर्फ अजित हरिशंकर यादव (वय ३५, रा. यु.पी), परवेज खान तरबेज खान (वय २८, रा. प्रतापगड यु.पी), कांतीलाल शांतिलाल ठाकरे (वय ४३, रा.जळगाव), ओम गेंदीलाल ठाकरे (वय १४, रा. जळगाव) हे जखमी झाले आहेत.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान अद्यापपर्यंत मयतांची नावे कळू शककेली नाहीत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घोडसगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही काही काळ विस्कळीत झाली होती.

पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली आहे. मुक्ताईनगर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.