महिला पोलिसाच्या कानशिलात मारणे पडले महागात, २ महिलांना अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमळनेर बस स्थानकावर चोरी करण्याचे सत्र सुरूच आहे. महिलेची पोत चोरून तिलाच मारहाण करणाऱ्या दोन्ही महिलांनी महिला कॉन्स्टेबलच्याही कानाखाली मारल्याने त्या दोघ महिलांना जेलची हवा खावी लागली आहे.

सविस्तर माहिती अशी की, अमळनेर बसस्थानकावर १७ डिसेंबर रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास अमळनेर ते चोपडा बसमध्ये सारबेटे येथील प्रतिभा राजेंद्र कोळी या महिलेची सोन्याची पॉट दोन महिलांनी चोरण्याचा प्रयत्न केला आणि तिलाच मारहाण केली. या वेळी बसस्थानकावर कर्तव्य बजावणारे अशोक कुमावत आणि महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे यांनी त्या महिलांना खाली उतरवून पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यावेळी नाशिक पंचवटी भागातील सुनीता सागर चौधरी (वय ३९) व जळगावच्या इच्छादेवी पोलीस चौकीमागे राहणाऱ्या ममता सतीश चौधरी (वय २५) या दोघीनी महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे यांच्या कानशिलात मारून शिवीगाळ केली. जरे यांनी तात्काळ दोघं महिलांना अटक केली.

या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करत आहेत. दोन्ही महिलांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना अटक करण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.