पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
काकनबर्डी यात्रेतुन १९ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली असून, बेपत्ता झालेल्या तरुणीच्या खबरीवरुन पाचोरा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून माहिती अशी की, १८ डिसेंबर रोजी गिरड रोडवरील काकनबर्डी येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेरायाचा यात्रोत्सवातुन पाचोरा शहरातील एका भागातील १९ वर्षीय तरुणी ही अचानक बेपत्ता झाली आहे. तरुणीचा सर्वत्र शोध घेतला असता, तरुणी मिळुन न आल्याने १९ डिसेंबर रोजी तरुणीच्या वडिलांच्या सांगण्यावरून हरविल्याची नोंद करण्यात आली. तरुणीचा शोध पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक हे घेत आहेत.