काय सांगता… बागेश्वर बाबा येणार जळगावात ?

संघटनांनी दिले यावर स्पष्टीकरण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील वडनगरी येथिल बडे जटाधारी महादेव मंदिरातर्फे गेल्या आठवड्यात झालेल्या शिव महापुराने कथेने लाखांच्या संख्येत प्रचंड गर्दी झाली होती. त्या वातावरणातून अजूनही लोक बाहेर आलेले नाही. तशातच आता पुन्हा बागेश्वर धाम येथील धीरेंद्रशास्त्री जळगावात दाखल होतील अशा चर्चांना उधाण आले आहे. बागेश्वरधाम सरकार यांची कथा कानळद्यात होणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागली आहे. ती एवढी व्हायरल झाली की, त्यावर खुलासा करण्याची वेळ काही संघटनांवर आली आहे.

पंडित मिश्रा यांच्या कथेला लाखोंच्या संख्येने गर्दी झाली होती. जळगावात १३ लाख भाविकांचा आकडा पार झाला होता. त्यांच्या कथेला मिळालेला प्रतिसाद पाहून बाबा बागेश्वर धाम सरकार हे देखील जळगाव येणार असल्याची चर्चा होती, आणि बघता बघता तशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. व्हायरल पोस्टद्वारे बाबांचे सुवर्णगरी जळगावात स्वागत करण्यात येणार आहे. सर्व परवानगी पूर्ण झाली असून, तारीख जाहीर करण्यात आली असल्याचे पोस्टमध्ये म्हंटले आहे. १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान बाबा बागेश्वर धाम कानळदा येथे येणार आहे. असे पोस्टमध्ये जाहीर करण्यात आले आहे.

संघटनांच्या नावाने पोस्ट व्हायरल
बागेश्वर धाम सरकार नवीन वर्षामध्ये कानळद्याला येणार असल्याची पोस्ट विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या नावाने व्हायरल झाल्यानंतर त्यावर अखेर विश्व हिंदू परिषदेला निवेदन काढावे लागले. तेही आता पोस्टद्वारे व्हायरल झाले आहे. बागेश्वर धाम पीठाधीश धीरेंद्रकुमार शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे कोणतेही आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यातर्फे करण्यात आलेले नाही. याबद्दल कोणी अफवा पसरवत असेल किंवा कार्यक्रमाच्या नावाने निधी मागे असेल तर देऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. विहिंपचे जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा यांच्या नावाने हे निवेदन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.