लोकशाही न्यूज नेटवर्क
सोमवारी रात्री चीनच्या गान्सू प्रांतात भूकंपाचा तीव्र धक्का बसला. लिंक्सिया येथील जिशिशन काउंटीमध्ये ६.२ तीव्रतेचा धक्का बसला. हा संपूर्ण थरारक अनुभव सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. चीनमधील हा भूकंप खूप तीव्र होता. यात इमारती कोसळून ११६ लोकांचा मृत्यू झाला आहे. या भागात बचावकार्य सुरु आहे.
चीनमधील गांसू प्रांतात १०५ जण ठार तर ४०० जण जखमी झाले आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर किंघाई प्रांतातील हैदोंग शहरात ११ जणांचा मृत्यू तर १०० जण जखमी झाले आहेत.
भूकंपाचा हा संपूर्ण थरारक अनुभव सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. ग्लोबल टाईम्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जमीन हादरतांना दिसत आहे. इमारतीचा काही भाग कोसळला आहे. तसेच अनेक लोक जीव वाचवण्यासाठी दुकाने आणि ऑफिसमधून बाहेर पडतांना दिसत आहे.
चीनच्या गांसू-किंघाई सीमावर्ती भागातील अनेक इमारती कोसळल्या आहेत. याठिकाणी मृतांची संख्या देखील जास्त आहे. आतापर्यंत जवळपास २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.