रुद्र लाल हनुमान मंदिरात महाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी चे वाटप…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

शहरातील बळीराम पेठ परिसरातील रुद्र लाल हनुमान मंदिरात दि 8 मार्च रोजी दुपारी 12 वाजता महाशिवरात्री निमित्त महा आरती करण्यात आली व त्या नंतर भाविकांना साबुदाणा खिचडी व केळी प्रसादाचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे, माजी नगरसेवक सुनील माळी, राजेश यावलकर, हितेश शाह, बन्सी डाबोरे, संदीप ढंढोरे यांच्या हस्ते प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप गुप्ता, भावेश पानसरे, सुरेश दिवेकर, राजाजी, संतोष अटवाल,नितीन पानसरे, आशुतोष ढंढोरे, रोहित बेंडवाल , हर्षल ढंढोरे, गौरव दिवेकर, जयंत ढंढोरे, चंद्रविर ढंढोरे,ध्रुव लोट यांचेसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.