प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य महर्षी वाग्भट

0

लोकशाही विशेष लेख

 

महर्षी वाग्भट (Maharishi Vagbhat) यांच्या कालाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. अष्टांगसंग्रह नावाचा आयुर्वेदावरचा एक ग्रंथ यांनी लिहिला आहे. वाग्भट नावाचे दोन आयुर्वेदाचार्य एकाच वंशात होऊन गेले आहेत. त्यापैकी अष्टांग संग्रहाच्या कर्त्याला म्हणजेच प्रस्तुत वाग्भटाला वृद्ध वाग्भट असे म्हणतात. यांनी अष्टांगसंग्रहाच्या उत्तरतंत्रात आपल्या विषयी माहिती सांगणारा पुढील श्लोक लिहिला आहे.

भिषग्वरो वाग्भट इत्यभून्मे पितामहो नामधरोऽस्मि यस्य । सुतोऽभवत्तस्य च सिंहगुप्तस्तस्याप्यहं सिन्धुषु जाताजन्मा
अर्थ : माझ्या आजोबांचे नाव वाग्भट असे असून, तेच नाव मलाही ठेवले गेले. त्यांचा पुत्र सिंहगुप्त हा माझा पिता असून, माझा जन्म सिंधू देशात झाला आहे.

चिनी प्रवासी इत्सिंग याने अष्टांगसंग्रहकर्ता आयुर्वेदाचार्य वाग्भट यांचा उल्लेख केला आहे. त्यावरून वृद्ध वाग्भट इ.स. च्या ७ व्या शतकाच्या पूर्वार्धति होऊन गेले असावेत असे अनुमान होन्लें यांनी केले आहे.

द्वारकाधीश दिगंबर जोशी
संस्कृत अध्यापक, जळगाव
(०२५७) २२३६८१५

Leave A Reply

Your email address will not be published.