राज्यासह खान्देशात हुडहुडी आणखी वाढणार !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागली आहे. आता या थंडीचा कडाका राज्यात आणखी वाढणार आहे. राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान आणखी कमी होऊ लागल्याने राज्यात थंडीचे प्रमाण आणखी वाढल्याचे पाहायला मिळणार आहे.

राज्यात परिस्थिती पाहता मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील किमान तापमानाने खाली उतरले आहे. तर विदर्भात किमान तापमानाचा पारा अजून स्थिर आहे. मात्र रविवारपर्यंत राज्यात किमान तापमान 3 अंशाने कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील दोन दिवस पहाटेच्या किमान तापमानात विशेष फरक जाणवणार नाही.

उद्या 11 नोव्हेंबरपासून पुढील 3 दिवस म्हणजे रविवारपर्यंत किमान तापमानात 3 अंशांपर्यंत घसरण होईल, अशी माहिती देण्यात आली नाही. तर राज्यातील बऱ्याचशा भागात ढगाळ वातावरण आहे. मात्र, तरी पावसाची शक्यता नाही. तसेच यामुळे सध्यापेक्षा थंडी आणखी जाणवणार आहे.

राज्यात विशेषत: खान्देशात थंडीचा प्रभाव अधिक राहणार आहे. तर दुपारच्या सध्याच्या कमाल तापमानात सरासरी 2 अशांच्या फरकामुळे राज्यात दुपारचे तापमान ऊबदार जाणवणार, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.