राज्यातून थंडी होणार गायब..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दुपारी उन्हाचे चटके अन् रात्री गारठा अशी परिस्थिती सध्या जळगावकर अनुभवत आहे. दरम्यान आता 15 फेब्रुवारीपासून राज्यातील थंडी गायब होणार असून पुढील काही दिवस राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असली तरी उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. काल बुधवारी औरंगाबाद, धुळे आणि जळगाव येथे पारा 10 अंशांच्या खाली होता. आज मात्र, या तिन्ही जिल्ह्यांत किमान तापमानात वाढ झाली आहे. औरंगाबाद आणि धुळे येथे पारा 11 अंशांवर तर जळगाव येथे तापमानाचा पारा 10.5 अंशांवर गेला आहे. राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान 11 ते 19 अंशांच्या दरम्यान आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

कमाल आणि किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

पुणे 33.1 (12.4), औरंगाबाद 32.2 (11), जळगाव 33.5 (10.5), धुळे 31 (11), कोल्हापूर 33.3(19.1), महाबळेश्वर 29.3 (15.8), नाशिक 32.3 (12), सातारा 33.6 (14.9), सोलापूर 35.3 (18.1), नांदेड 33.4 (16.2), परभणी 33.3(14.6), अकोला 34.4 (14.1), अमरावती 34(12.7), बुलडाणा 31(15.4), ब्रह्मपुरी 33.9 (16.8)

Leave A Reply

Your email address will not be published.